दिल्लीतील ग्रॅण्ड रिसेप्शननंतर कुठे चालले विरूष्का ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नवदाम्पत्य सकाळी मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लपू शकले नाही.

Updated: Dec 22, 2017, 03:29 PM IST
दिल्लीतील ग्रॅण्ड रिसेप्शननंतर कुठे चालले विरूष्का ? title=

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नवदाम्पत्य सकाळी मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लपू शकले नाही.

आखलेल्या योजनेनुसार २१ डिसेंबर ला दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती.

या रिसेप्शन पार्टीत विराट आणि अनुष्का यांचे मित्र मंडळी पोहोचली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.

दिल्ली एअरपोर्टवर

विराट आणि अनुष्का शुक्रवारी सकाळी दिल्ली एअरपोर्टवर मीडियाच्या कॅमेरात कैद झाले. यावेळी काळा गॉगल आणि काळा टी शर्ट घालून विराट हॅण्डसम दिसत होता. तर अनुष्कादेखील पारंपारिक वेशात दिसली. 

मुंबईसाठी रवाना

हे दोघे कुठे चालले याचा खुलासा झाला नाही. पण दिल्लीतील ग्रॅण्ड पार्टीनंतर दोघेही मुंबईसाठी रवाना झाल्याचे बोलले जाते.

'फर्स्ट स्पॉट' यासंबंधीचे वृत्त आणि फोटो शेअर केले आहेत.


( फोटो साभार-फर्स्ट पोस्ट)

२६ तारखेला रिसेप्शन

विराट आणि अनुष्का यांनी आपल्या मित्रपरिवारासाठी मुंबईत २६ डिसेंबरला रिसेप्शन पार्टी ठेवली आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबईतही शानदार सोहळ रंगणार आहे. जिथे बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातल्या हस्ती दिसतील.