सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे पक्के मित्र, एकेकाळी जय वीरुची त्यांची जोडी...नुकताच मुंबईतील शिवाजी पार्कात झालेल्या एका कार्यक्रमात या दोघांच्या भेटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांचे वय जवळपास सारखंच पण एक फिटनेसमध्ये एक नंबर तर दुसऱ्या वृद्धापकाळाकडे झुकलेला. गेल्या काही दिवसांमध्ये विनोद कांबळीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळीची स्थितीपासून त्याच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केलंय.
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघे एकत्र शिकले आणि एकत्र खेळले अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. 90 च्या दशकात, दोघेही भारतीय क्रिकेटमध्ये नवीन उंची आपलं स्थान मिळवलं. 21 व्या शतकात कांबळीच्या कारकीर्दला ब्रेक लागला. सचिननंतर वर्षभरात पदार्पण करणाऱ्या विनोद कांबळीने 2000 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण यात सचिन खेळत राहिला अन् 2013 मध्ये करिअरला अलविदा केला. निवृत्तीनंतर सचिन आणि कांबळी दोघांनाही बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येत आहे. या दोघांना नेमकं किती पेन्शन देण्यात येत आहे, पाहूयात.
सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीपेक्षा जास्त पेन्शन मिळते. एका अहवालानुसार, सचिन तेंडुलकरला बीसीसीआयकडून दर महिन्याला मिळणारी पेन्शनची रक्कम 50,000 रुपये आहे. त्याचवेळी, विनोद कांबळीला बीसीसीआयकडून दरमहा 30,000 रुपये, म्हणजेच 20,000 रुपये कमी मिळतात. कांबळी सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, त्या परिस्थितीत त्याला बीसीसीआयकडून मिळणारे पेन्शन हेच त्याच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. त्या पेन्शनच्या रकमेशिवाय सचिन 1400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचाही मालक आहे.
विनोद कांबळी केवळ 9 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, तर सचिन दोन दशकांहून अधिक काळ खेळला. कांबळीने भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एकूण 3500 हून अधिक धावा केल्या. तर सचिन तेंडुलकर 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी-20 खेळला. या काळात त्याने एकूण 34357 धावा केल्या आणि 100 शतके झळकावली. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील क्रिकेटमधील या फरकाचा परिणाम या दोघांना मिळणाऱ्या पेन्शनवरही दिसून येत आहे.
अलीकडेच राहुल द्रविडने सांगितलं की, कांबळी सचिनच्या मागे कसा पडला. कांबळीकडे चेंडू मारण्याची क्षमता आहे. पण इतर क्षेत्रात त्याच्याकडे प्रतिभा नाही. तर मीडिया रिपोर्ट आणि क्रिकेट विश्वातील काही लोकांच्यानुसार त्याचा दारूच्या व्यसनामुळे तो आज या स्थितीमध्ये पोहोचलाय.