VHT 2021 | Ruturaj Gaikwad चा धमाका, स्पर्धेत खणखणीत चौथं शतक

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) धमाका विजय हजारे स्पर्धेतही (Vijay Hazare Trophy 2021) कायम आहे.

Updated: Dec 14, 2021, 06:02 PM IST
VHT 2021 | Ruturaj Gaikwad चा धमाका, स्पर्धेत खणखणीत चौथं शतक title=

राजकोट : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) धमाका विजय हजारे स्पर्धेतही (Vijay Hazare Trophy 2021) कायम आहे. ऋुतुराजने चंडीगढ (Chandigarh) विरुद्धच्या सामन्यात आणखी एक शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऋुतुराजचं चंडीगड विरुद्धचं हे शतक या मोसमातील चौथं शतक ठरलंय. यासह ऋुतुराज सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत 500 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Vijay Hazare Trophy 2021 Chandigarh vs maharashtra captain Ruturaj Gaikwad scores his 4 th century in 5 matches at Saurashtra Cricket Association Stadium C at Rajkot) 

चंडीगडने दिलेल्या 310 धावांच्या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराजने हे शतक ठोकलं. ऋुतुराजने 95 चेंडूत 7 चौकार आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. ऋुतुराजचं मागील 5 सामन्यातील हे चौथं शतक ठरलं. 

ऋतुराजने या सामन्यात एकूण 132 चेंडूत 12 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 168 धावांची खेळी केली. या खेळीमुळे महाराष्ट्राच्या विजयाची वाट आणखी सोपी झाली. महाराष्ट्रने चंडीगडवर 5 विकेट्सने विजय मिळवला.  

ऋुतु'राज'

या स्पर्धेत ऋुतुराजने चंडीगड विरुद्धच्या सामन्याआधी अनुक्रमे 136, नाबाद 154, 124 आणि 21 धावांची खेळी केली होती.   

दरम्यान ऋतुराजने चंडीगड विरुद्धच्या शतकासह विराट कोहली अन्य फलंदाजांच्या  विक्रमाची बरोबरी केली आहे.

ऋुतुराजने विजय हजारे स्पर्धेच्या एका मोसमात कोहली, देवदत्त पडीक्कल आणि पृथ्वी शॉ यांच्या 4 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

ऋतुराजने आणखी एक शतक लगावल्यास तो इतिहास रचेल. त्यामुळे ऋतुराज पाचवं शतक लगावतो का, याकडे लक्ष असणार आहे.

 

ऋतुराज गायकवाडचं शानदार शतक