व्हिडिओ : गल्लीतल्या पोरांबरोबर क्रिकेटचा देव रस्त्यावर उतरतो तेव्हा...

या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही

Updated: Apr 16, 2018, 06:23 PM IST
व्हिडिओ : गल्लीतल्या पोरांबरोबर क्रिकेटचा देव रस्त्यावर उतरतो तेव्हा...  title=

क्रिकेट : सध्या देशभरात टी २० क्रिकेटची धूम सुरू असताना, वांद्र्यातल्या रस्त्यावर एक वेगळीच मॅच रंगली होती.. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर... हा देव सध्या रिटायर झाला असला तरी तो रस्त्यावर उतरून क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

रविवारी रात्री वांद्र्यामध्ये हॉटेलात काम करणारी काही मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत होती... त्याचवेळी सचिन तेंडुलकर तिथून गाडीतून निघाला होता... या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही... त्यानंही या मुलांबरोबर क्रिकेटचा आनंद लुटला.