VIDEO: मुंबईविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर 'ब्राव्हो' स्टाईल जल्लोष

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. 

Updated: Apr 9, 2018, 07:27 AM IST
VIDEO: मुंबईविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर 'ब्राव्हो' स्टाईल जल्लोष title=

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.

दुखापतग्रस्त जाधवची शानदार खेळी

या मॅचमध्ये बॅटिंगला आलेला केदार जाधव बॅटिंगला आलेल्या केदार जाधवच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर जाधवला मैदान सोडून जावं लागलं. अखेर ९ विकेट पडल्यानंतर जाधव पुन्हा बॅटिंगला आला.

शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. पण केदार जाधवला दुखापत झाल्यामुळे तो धावून एकही रन काढू शकत नव्हता. मुस्तफिजून रहमानच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलला केदार जाधवला एकही रन काढता आली नाही. पण ओव्हरच्या चौथ्या बॉलला जाधवनं सिक्स आणि पाचव्या बॉलला फोर मारून चेन्नईला जिंकवून दिलं.

विजयानंतर ब्राव्होचा डान्स

चेन्नईच्या विजयानंतर ब्राव्होनं त्याच्या खास स्टाईलमध्ये जल्लोष केला. हरभजन सिंग, मुरली विजय आणि चेन्नई सुपरकिंग्जनं त्यांच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर हे व्हिडिओ शेअर केले आहेत. 

 

What a CHAMPION @djbravo47

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

 

 

This is the way to celebrate a win the DJ bravo way

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on