Untold story : वर्षभर 'हा' खेळाडू जेवला नव्हता; आणि जेव्हा जेवण समोर आलं तेव्हा...

डेब्यू केल्यानंतर नीता अंबानी यांनी फोन करून त्याचं कौतुकंही केलं.

Updated: May 7, 2022, 11:47 AM IST
Untold story : वर्षभर 'हा' खेळाडू जेवला नव्हता; आणि जेव्हा जेवण समोर आलं तेव्हा... title=

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या गेल्या सामन्यात कार्तिकेय सिंहने डेब्यू केलं होतं. त्यावेळी त्याला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. डेब्यू केलेल्या सामन्यात त्याने चमक दाखवली. यानंतर नीता अंबानी यांनी फोन करून त्याचं कौतुकंही केलं. नुकतंच कार्तिकेयने एका वेब पोर्टलसोबत चर्चा केली असून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Kartikeya Singh 1 वर्ष जेवला नाही

क्रिकेटर होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे खरं आहे. शिवाय यानंतरही भविष्यात कधी नॅशनल टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल याची शाश्वती नाही. एखाद्या क्रिकेटपटूमध्ये काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असाच काहीसा प्रकार मुंबईचा युवा खेळाडू कार्तिकेय सिंगच्या आयुष्यात घडला आहे.

वेब पोर्टलशी बोलताना कार्तिकेयने सांगितलं की, क्रिकेट अकादमीपासून सुमारे 70-80 किमी अंतरावर असलेल्या कारखान्यात मी काम केलंय. त्यानंतर सकाळी उठून पुन्हा इतका लांब पल्ला गाठायचा होता. जेव्हा माझ्या कोचना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मला अकादमीच्या स्वयंपाघराच्या बाजूला राहण्याची ऑफर दिली. 

स्वतःची कहाणी सांगताना कार्तिकेय पुढे म्हणतो, "जेव्हा मी पहिल्यांदा स्वयंपाकाच्या शेजारी थांबलो तेव्हा तिथे मला दिवसा जेवण दिलं गेलं. त्यावेळी पटकन माझे डोळे पाणावले होते. कारण जवळपास वर्षभर मी दुपारचं जेवण जेवलो नव्हतो."

कार्तिकेयने त्याच्या करियरमध्ये 10 रुपये वाचवण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठलाय. जेणेकरून तो उरलेल्या पैशातून काहीतरी खाऊ शकेल. 

सुरुवातीच्या आयुष्यात त्याने गाझियाबादमधील एका कारखान्यात मजूर म्हणून काम केलं. यावेळी कारखान्याजवळ भाड्याने खोली घेतली होती. कार्तिकेय सिंह रात्रभर कारखान्यात काम करायचा आणि सकाळी लवकर अकादमीत जाऊन त्याचं स्वप्न पूर्ण करायचा.