क्रिकेट सोडून बुमरहाने संजनासाठी केली खास गोष्ट, पाहा व्हिडीओ

पत्नीसाठी काहीही! क्रिकेट सोडून बुमराहने संजनासाठी काय केलं पाहा व्हिडीओ 

Updated: May 7, 2022, 10:59 AM IST
क्रिकेट सोडून बुमरहाने संजनासाठी केली खास गोष्ट, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईकडून खेळताना जसप्रीत बुमराहची फार विशेष कामगिरी पाहायला मिळाली नाही. भरवशाचा खेळाडू म्हणून मुंबई टीम त्याच्याकडे पाहात होतं. मात्र तोही या हंगमाता फेल होता. 

आपल्या यॉर्करने फलंदाजांची हवा काढणारा बुमराह खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक असल्याचं पाहायला मिळालं. संजना आणि बुमराहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बुमराह क्रिकेटसोडून पत्नीसाठी खास गोष्ट करताना दिसत आहे. बुमराहची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. 

बुमराह-संजयनाच्या व्हिडीओची चर्चा
बुमराहने पत्नी संजयनाचा वाढदिवस साजरा केला. या वेळी बुमराह फोटोग्राफर बनल्याचं पाहायला मिळालं. संजनाचे खूप फोटो बुमराहने काढले. यावेळी बुमराह कॅमेऱ्याने संजनाचे फोटो काढताना दिसला. संजनाही त्याला एकापाठोपाठ एक फोटोसाठी पोज देत असल्याचं दिसलं. 

माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असं बुमराहने या व्हिडीओवर कॅप्शनही दिलं आहे. 6 मे रोजी बुमराहची पत्नी संजनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संजनाला सोशल मीडियावरही क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

बुमराह-संजनाने गेल्यावर्षी मार्चमध्ये लग्न केलं. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई टीमकडून खेळत आहे. तर संजना या लीगचं अँकरिंग करत आहे. संजनाच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)