नवी दिल्ली : एखादा खेळाडू किती वेगवेगळ्या प्रकारे बॉल खेळू शकतो हे सध्याच्या टी-२० क्रिकेटमध्ये तितकं महत्वाचं वाटणार नाही. क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकरही पाच प्रकारे शॉट खेळतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका क्रिकेटर संदर्भात सांगणार आहोत जे एक-दोन नाही तर १२ प्रकारे शॉट खेळतो.
२०१२ साली आपल्या कॅप्टनशीपमध्ये देशाला अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या या खेळाडूला आयपीएलमध्ये कुणीही खरेदी केलं नाही.
या क्रिकेटरचं स्थानिक क्रिकेटमध्येही प्रदर्शन चांगलं होतं. मात्र, कदाचित इतकं चांगलं नसेल त्यामुळे निवड समितीने त्याला निवडलं नसावं. आम्ही बोलत आहोत उन्मुक्त चंद याच्यासंदर्भात...
उन्मुक्तच्या सध्याच्या प्रदर्शनावर नजर टाकली तर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत दिल्लीच्या टीमला क्वार्टरफायनल पर्यंत पोहोचवलं. तर, उत्तर प्रदेश विरोधात खेळताना त्याने जखमी असतानाही ११६ रन्सची इनिंग खेळली. या इनिंगमुळे टीमला ५५ रन्सने विजय मिळवता आला.
तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये हाफ सेंच्युरीची इनिंग खेळत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला. इतकं चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी आयपीएल टीम खरेदीदारांना त्याला टीममध्ये घेतलं नाही.
मात्र, उन्मुक्त यामुळे नाराज नाहीये तर त्याचा दावा आहे की पुढील आयपीएल लिलिवात त्याला टीममध्ये घेण्यासाठी स्पर्धा लागेल. कारण, तो एक बॉल तब्बल १२ वेगवेगळ्या प्रकारे खेळून बाऊंड्रीपार करु शकतो. दिग्गज खेळाडूंचे सल्ले घेत ही शैली त्याने अवगत केली असल्याचं उन्मुक्त सांगतो.