ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 69 धावांत गुंडाळण्यात आला. पाकिस्तानला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मनोज कार्ला यांनी चांगली भागीदारी केली. शॉने ४१ धावा केल्या तर कार्लाने ४७ धावांची खेळी केली.
शुभम गिलने ९४ बॉल खेळताना नाबाद १०२ धावा केल्या. यात त्याच्या ७ चौकारांचा समावेश आहे.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला केवळ 69 धावा करता आल्या. भारताच्या इशान पोरेल याने ४ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार लावण्यात यश मिळवले. त्याला साथ दिली आर परागने त्याने दोन विकेट घेतल्या.