२ वर्षानंतर गेलला इंडिजच्या वनडे टीममध्ये संधी

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल यांना वनडे सामन्यांसाठी संधी मिळाली आहे. विंडीजच्या संघात १५ खेळाडुंच्या यादीत यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज ५ एकदिवसीय सामने होणार आहेत.

Updated: Aug 22, 2017, 12:00 PM IST
२ वर्षानंतर गेलला इंडिजच्या वनडे टीममध्ये संधी title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल यांना वनडे सामन्यांसाठी संधी मिळाली आहे. विंडीजच्या संघात १५ खेळाडुंच्या यादीत यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज ५ एकदिवसीय सामने होणार आहेत.

२१ मार्च २०१५ ला क्रिस गेल विंडीजकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता. मार्लन सॅम्युएलही ऑक्टोबर २०१६ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना विंडीजकडून खेळला होता. 

गेल जर या सिरीजमध्ये खेळला तर विंडीजकडून सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम गेलच्या नावावर होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी विंडीजचा संघ: 

सुनील अम्बरीस, देवेंद्र बिशू, मिन्गुइल कमिन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर (कर्णधार), कायले होप, शाई होप, अलझाररी जोसेफ, एवीन लेविस, जेसन मोहम्मद (उपकर्णधार), ऍशली नर्स, रोवमान पॉवेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर, केसरीक विल्यम्स