Travis Head Century: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ट्रॅव्हिस हेडने दमदार शतक ठोकलं आहे. ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी 200 धावा पूर्ण केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या इतिहासात फायनलमध्ये (WTC Final 2023) एकाही खेळाडूला शतक ठोकता आलं नव्हतं. मात्र, ट्रॅव्हिस हेड हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय. (Travis Head Become first centurion in World Test Championship Final history)
ट्रॅव्हिस हेडचं भारताविरुद्ध पहिलंच शतक आहे. 2018 मध्ये डेब्यू केलेल्या ट्रॅव्हिस हेडने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर (Travis Head Career) आंतरराष्ट्रीय रॅकिंगमध्ये तिसरं स्थान मिळवलं. आत्तापर्यंत 36 कसोटी सामने खेळलेल्या हेडने 57 इनिंगमध्ये 2361धावा केल्या आहेत. त्यात 13 फिफ्टीचा देखील समावेश आहे.
The first centurion in World Test Championship Final history
Take a bow, Travis Head
Follow the #WTC23 Final https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/PFyd7UzcZX
— ICC (@ICC) June 7, 2023
इंग्लंडच्या द ओव्हलच्या मैदानावर ट्रॅव्हिस हेडने 106 चेंडूत शतक ठोकलं. त्यात 14 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. हेडच्या कारकिर्दीमधील हे 6 वं शतक आहे तर परदेशातील त्याचं हे पहिलंच शतक आहे. त्यामुळे त्याचं शतक पूर्ण झाल्यावर संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघाने टाळ्या वाजवत अभिवादन केलंय.
आणखी वाचा - विराट कोहली क्रिकेटर नसता तर... पाहा लाडक्या चिकूचे AI फोटो
ऑस्ट्रेलिया (Playing XI): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (WC), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (WC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.