IPL | कामगिरी हिट, कमाई सुपरहिट, IPLमध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 खेळाडू

आयपीएलमध्ये अनेक खेळाडू मालामाल होतात. खेळाडूंवर 20 लाखांपासून ते 15 कोटींच्या घरात बोली लावली जाते. 

Updated: Oct 11, 2021, 07:23 PM IST
IPL | कामगिरी हिट, कमाई सुपरहिट, IPLमध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 खेळाडू title=

मुंबई : आयपीएल स्पर्धेला (IPL) सुरुवात झाल्यापासून युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं. युवा खेळाडूंना या आयपीएलच्या माध्यामातून व्यासपीठासह प्रसिद्धी विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांसाठी लाखो रुपये मिळतात. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते. असे मोजकेच खेळाडू आहेत जे 2008 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रत्येक मोसमात खेळले आहेत. या निमित्ताने आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंची कमाई किती आहे, हे जाणून घेऊयात. (Top 5 highest earning players in IPL history know Virat Kohli ms dhoni rohit sharma salary)    

सर्वाधिक कमाईच्या बाबतीत टॉप 5 खेळाडूंमध्ये 4 भारतीय आणि 1 परदेशी खेळाडूचा समावेश आहे. यात अनुक्रमे विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डी व्हीलियर्सचा समावेश आहे. कमाईच्या बाबतीत विराट या यादीत अव्वल स्थानी आहे. 

विराट कोहली-17 कोटी (Virat Kohli)

RCB चा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) कमाई ही सर्वाधिक आहे. विराटला सध्या ₹ 170,000,000 मिळतात. विराटने 2008 पासून ते आतापर्यंत एकूण 1,466,000,000 कमावले आहेत.

महेंद्रसिंह धोनी - 15 कोटी (Mahendra Singh Dhoni)
 
चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीचा (Mahendra Singh Dhoni) सध्याचा पगार ₹ 150,000,000 आहे. धोनीने 2008 ते 2021 पर्यंत 1,528,400,000 कमावले आहेत.

रोहित शर्मा 15 कोटी (Rohit Sharma)
 
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माचा सध्याचा पगार ₹ 150,000,000 इतका आहे. रोहितने 2008 पासून ₹ 1,432,000,000 कमावले आहेत. रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 

सुरेश रैना 11 कोटी (Suresh Raina)

या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. रैना एका मोसमासाठी 11 कोटी रुपये घेतो. त्याने 2008 पासून आतापर्यंत 10 1,107,400,000 कमावले आहेत.

एबी डीव्हीलियर्स 11 कोटी (AB de Villiers)

आरसीबीचा विकेटकीपर-बॅट्समन एबी डिव्हिलियर्सचा सध्याचा पगार 1,025,165,000 इतका आहे. 'मिस्टर 360' ने आतापर्यंत  110,000,000 ची कमाई केली आहे.