मुंबई : आज निरज चोप्राला कोण ओळखत नाही? आज तो भारताचा स्टार आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. त्यामुळेच तो संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनला आहेत. ज्यामुळे तो सध्या सगळ्याच सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अलीकडे, नीरज चोप्राचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जरी जुना असला, तरी निरज चोप्राला जाणून घेण्यासाठी लोकं त्याला व्हिडीओला अगदी मजा घेऊन पाहात आहेत.
या व्हिडीओला @TajinderBagga नावाच्या ट्विटर यूजरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हा व्हिडीओ फक्त 54 सेकंदांचा आहे, परंतु यामधील नीरजचा साधेभोळे पणा पाहून तुम्ही वेडे व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक अँकर नीरज चोप्राकडे जातो आणि त्याला प्रश्न विचारू लागतो. नीरज चोप्रा त्याला उत्तर देण्यासाठी त्याच्या सिटवरून उठतो, मग अँकर त्याला बसण्यास सांगतो. जेव्हा अँकर त्याला इंग्रजीत प्रश्न विचारतो, तेव्हा नीरज चोप्रा यावर म्हणतो, सर! प्रश्न हिंदीत विचारा.
त्यानंतर अँकर त्याला हिंदीत प्रश्न विचारतो की, तुला भाला फेकण्यात (Javelin Throw) रस कधीपासून निर्माण झाला? तेव्हा नीरजने त्यांना उत्तर देताना सांगितले की, "गावात वेगवेगळे खेळ खेळले जातात, जेव्हा मी वरिष्ठांना हा खेळ खेळताना पाहिले, तेव्हा मी देखील खेळण्यास सुरुवात केली."
त्यानंतर अँकरचा लगेचच निरजला पुढील प्रश्न विचारतो की, हेअरस्टाईलसाठी तुझी प्रेरणा कोण आहे? शाहरुख की इशांत शर्मा? यावर नीरज चोप्रा उत्तर देतो की, कोणी नाही, मी स्वतःच आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर 26 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 5 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे, तर 1 हजारहून अधिक लोकांनी त्याला रीट्वीट केले आहे. अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत. गोल्फ खेळाडू अर्जुन भाटीने कमेंट्समध्ये लिहिले की, मी सुद्धा या क्षणाचा साक्षीदार आहे. मी त्यावेळी तेथे उपस्थीत होतो.
Desi Chora Neeraj Chopra Old Interview pic.twitter.com/1g3wayNoJz
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) August 9, 2021
तसेच एका युजरने टिप्पणी करताना त्याने लिहिले - मी याच्या साधेपणामुळे प्रभावित झालो आहे. हिंदीत बोलणे, समोरच्या व्यक्तीला आदर देणे हे एका चांगल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे.