सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटपूर्वी हा खेळाडू तोडेल

  मुंबईमध्ये न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक लगावले.  

Updated: Oct 24, 2017, 07:43 PM IST
सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटपूर्वी हा खेळाडू तोडेल title=

नवी दिल्ली :  मुंबईमध्ये न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक लगावले.  

 
हे शतक यामुळे खास होते, की ते २०० व्या सामन्यात केले. यापूर्वी २०० सामन्यात एबी डीव्हिलिअर्सनेही शतक झळकावले होते. 

विराटचे हे आंतरराष्ट्री क्रिकेटमधील ३१ वे वन डे शतक आहे. यासोबत त्याने वन डे शतकांच्या शर्यतीत रिकी पांन्टिगला मागे टाकले आहे.  पॉन्टिंगच्या नावावर ३० शतक आहेत. 

एकूण शतकांचा विचार करता विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतकं झळकावली आहेत. आता चर्चा सुरू झाली की सचिनच्या १०० शतकांचा विक्रम कोण तोडणार सचिनने वनडेमध्ये  ४८ शतक झळकावली आहेत. तर टेस्टमध्ये ५२ शतक झळकावली आहेत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा स्पीड खूप जास्त आहे. २०० सामन्यात सचिनच्या नावावर १८ शतक होते तर विराटच्या नावावर ३१ शतक आहेत. त्यामुळे तो सचिनच्या विक्रमाला खूप मोठा धोका आहे. 

हा खेळाडू निघू शकतो पुढे...

सचिनच्या विक्रमाला विराट गवसणी घालू शकतो पण त्यापूर्वी आणखी एक खेळाडू खूप वेगात पुढे जात आहे. त्याचे नाव आहे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला. शतकांच्या बाबती तो खूप वेगात पुढे चालला आहे. सध्या हाशीम आमलाच्या नावावर ५४ शतक आहेत. विराटपेक्षा त्याने ६ शतक अधिक लगावले आहेत. 

विराट टेस्टमध्ये स्लो..

विराट वन डेमध्ये जलद गतीने शतक लगावत आहे पण टेस्टमध्ये तो थोडा स्लो आहे. विराटने टेस्टमध्ये ६० सामन्यात १७ शतक लगावले आहेत. तर हाशिम आमलाने १०९ सामन्यात २८ शतक झळकावली आहेत. तर वन डेमध्ये त्याने १५८ सामन्यात २६ शतके झळकावली आहेत.