Match Fixing: सध्या भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वनडे सिरीज सुरु असून बुधवारी या सिरीजमधील शेवटचा सामना रंगला. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इहसानुल्लाह जनतवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला आहे. यावेळी या आरोपाखाली पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी याबाबत माहिती दिली. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सिझनदरम्यान ACB आणि ICC भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन झालं होतं. दरम्यान हे उल्लंघन केल्यामुळे इहसानुल्लाह जनतवर ही बंदी घालण्यात आली आहे.
काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सिझनमध्ये फलंदाज जनतने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याचं एसीबीने म्हटलं आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार, "जन्नतला आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम 2.1.1 चं उल्लंघन केल्याबद्दल दोषी करार देण्यात आला आहे. यावेळी पाच वर्षांसाठी क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे,"
एसीबीच्या निवेदनात एका निवेदनात म्हटले आहे. त्याने आरोप स्वीकारले आहेत आणि भ्रष्ट कारवायांमध्ये सामील असल्याची कबुली दिली आहे.”
जनत हा अफगाणिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार नवरोज मंगलचा धाकटा भाऊ आहे. त्याने अफगाणिस्तानसाठी तीन टेस्ट आणि 16 वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान ACB अशाच भ्रष्ट कारवायांमध्ये इतर तीन खेळाडूंची चौकशी करत आहे. त्यांच्या अपराधाच्या पुष्टीनुसार निर्णय घेतला जाणार आहे.
जनातने अफगाणिस्तानसाठी सर्व फॉरमॅटमध्ये 20 सामने खेळले आहेत. वनडे सामन्यांमध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 21.92 च्या सरासरीने 307 रन्स केले आहेत. त्याने तीन टेस्ट 22.00 च्या सरासरीने 110 रन्स केले आहेत.