आयपीएलच्या सगळ्या टीमचे कर्णधार ठरले

आयपीएलच्या अकराव्या सीझनला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

Updated: Mar 29, 2018, 06:28 PM IST
आयपीएलच्या सगळ्या टीमचे कर्णधार ठरले title=

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सीझनला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये होणार आहे. याआधी सगळ्या टीमच्या सरावालाही सुरुवात झाली आहे.

दोन टीमचं कमबॅक

या आयपीएलमध्ये चेन्नई सुपकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीमचं कमबॅक झालं आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी या दोन्ही टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यांच्याऐवजी रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या टीम खेळल्या होत्या.

कॅप्टनही ठरले

सगळ्या ८ टीम्सनी त्यांचे कर्णधार निवडले आहेत. राजस्थान रॉयल्सनं याआधी स्टिव्ह स्मिथ आणि सनरायजर्स हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरला कॅप्टन केलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एका वर्षाची बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलच्या अकराव्या सीझनला हे दोघं मुकणार आहेत. हे दोघंही आयपीएलच्या टीमचे कर्णधार असल्यामुळे त्यांच्या टीमनी नवीन कर्णधाराची निवड केली आहे.

आयपीएलच्या आठ टीमचे कर्णधार 

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा

चेन्नई सुपकिंग्ज- एम.एस.धोनी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-  विराट कोहली

सनरायजर्स हैदराबाद- केन विलियमसन

राजस्थान रॉयल्स- अजिंक्य रहाणे

किंग्ज इलेव्हन पंजाब- आर. अश्विन

कोलकाता नाईटरायडर्स- दिनेश कार्तिक

दिल्ली डेअरडेव्हिल्स- गौतम गंभीर

एकच परदेशी कर्णधार

यंदाच्या आयपीएल टीममध्ये एकच परदेशी कर्णधार आहे. सनरायजर्स हैदराबादनं न्यूझीलंडच्या केन विलियमसनची कर्णधार म्हणून निवड केली आहे.