मुंबई : जेव्हा आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली, तेव्हा 15 सदस्यीय संघात एक नाव दिसले ज्याची क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा नव्हती. पण तरी अनेक जण हे नाव संघात आल्याने खूश आहेत.
भारताचा ज्येष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा 2021 च्या टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्याच्या अनुभवामुळे बीसीसीआय प्रभावित झाला. ज्यामुळे तो आता आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक आहे. याआधी ही अश्विनने आपल्या कामगिरीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. T-20 world cup 2021
या जागतिक स्पर्धेसाठी वॉशिंग्टन सुंदरचे नाव निश्चित मानले जात होते कारण त्याने फिरकी गोलंदाजीसह चांगली फलंदाजी केली होती, पण इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. यामुळे 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली नव्हती आणि कदाचित यामुळेच अश्विनचे नशीब उघडले .
रविचंद्रन अश्विनने 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 6.97 च्या इकॉनॉमी रेटने 52 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाला टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा फायदा करुन घ्यायचा आहे हे उघड आहे.
रविचंद्रन अश्विनसाठी (R Ashwin) हा शेवटचा टी-20 विश्वचषक ठरू शकतो आणि त्याला पुन्हा अशी संधी मिळणार नाही. याचे कारण पुढील वर्षी 2022 चे टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे आणि वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजी अष्टपैलूंची तिथे अधिक गरज असेल.