Shahid Afridi: बीसीसीआय ( BCCI ) आणि पाकिस्तान यांच्यामधील वाद आता सर्व जगाला माहितीये. या दोन्ही क्रिकेट बोर्डातील वाद थांबायचं नाव घेईनात. आशिया कपमध्ये हायब्रिड मॉडल ( Hybrid Model ) वापरलं जाणार असून हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे एशिया कपचे सामने आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहेत. दरम्यान या दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये असलेल्या मतभेदांवर शाहिद अफ्रीदी ( Shahid Afridi ) भाष्य केलं आहे.
आशिया कपनंतर टीम इंडियाला ( Team India ) वनडे वर्ल्डकप देखील खेळायचा आहे. मुख्य म्हणजे या वर्ल्डकपचं आयोजन भारतात होणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आयसीसीचा वनडे वर्ल्डकप ( Cricket World Cup ) भारतात खेळवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबरपासून वनडेच्या वर्ल्डकपला ( Cricket World Cup ) सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) सामना खेळण्यास नकार दिलाय. आणि यानंतर अजून एका वादाला तोंड फुटलं.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi ) वक्तव्य केलंय. शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi ) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप दरम्यान सामने न खेळण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाला विरोध केलाय.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाला विरोध करत शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi ) म्हणाला, अहमदाबादमध्ये खेळण्यावर का मनाई करताय. तिथल्या पिचमधून ज्वाळा येतात की, त्या स्टेडियममध्ये भूत आहे? पाकिस्तान क्रिकेट टीमला अहमदाबादमध्ये खेळलं पाहिजे. इतकंच नाही तर त्या स्टेडियममध्ये खेळून लाखो क्रिकेट चाहत्यांसमोर भारताचा पराभव केला पाहिजे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न खेळण्याचा निर्णय हा चुकीचा आहे. तिथे जा...खेळा आणि जिंका. हा एकच पर्याय असल्याचंही, आफ्रिदीने ( Shahid Afridi ) सांगितलंय.
पाकिस्तानमधील शाहिद हा एक लोकप्रिय क्रिकेटपटू असून तो त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्याने त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घराचा आहेर दिल्याचं म्हटलं जातंय.