Kuldeep Yadav: वर्ल्डकपची स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून 2 सेमीफायनलचे सामने आणि फायनल सामना आता बाकी आहे. यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया ( Team India ) एकमेव अशी टीम आहे, जिने आतापर्यंत सलग 9 विजय मिळवले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाला ( Team India ) न्यूझीलंड विरूद्ध सेमीफायनल खेळायची आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पिच संदर्भात अनेक चर्चा होत असून टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) याबाबत आपलं मत मांडलं आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात कोणत्या गेम प्लॅनसह टीम इंडिया ( Team India ) उतरू शकते, याबाबत कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) माहिती दिलीये. तो म्हणाला की, वानखेडे हे गोलंदाजांसाठी कठीण ठिकाण आहे. पण किवी टीमवर वर्चस्व राखण्यासाठी भारतीय टीमला लवकर विकेट्स लागतील.
कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) सांगितले की, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टीम इंडियाने लवकर विकेट घेतल्यास सामन्यावर आमचं नियंत्रण असेल. वानखेडे मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी अवघड खेळपट्टी आहे. याठिकाणी बाऊन्स चांगला असतो आणि तिथे अनेकदा फलंदाज वर्चस्व गाजवतात.
गोलंदाजांना खेळात परतण्यासाठी भरपूर वेळ आहे. यावेळी आम्हाला लवकर विकेट्स काढाव्या लागतील. ही खेळपट्टी गोलंदाजांना चांगले आव्हान देऊ शकते, असंही कुलदीप म्हणालाय.
कुलदीप यादव ( Kuldeep Yadav ) पुढे म्हणाला, आम्ही न्यूझीलंडसोबत अनेक सिरीज खेळल्या आहेत. त्यामुळे आम्हाला परिस्थिती समजते. आमची तयारी चांगली झाली असून आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगले क्रिकेट खेळतोय. आगामी सामन्यातही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
कुलदीप यादवच्या वर्ल्डकपच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 9 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 4.15 राहिला आहे. त्याचबरोबर सध्याच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त आहे. टीम इंडियाने अजिंक्य राहताना सलग 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळेच भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाकडून वर्ल्डकप जिंकण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.