वडील कॅंसरशी लढतायत, मुलाने भारतासाठी 'सुवर्ण' आणलं

कॅंसरशी झुंजणाऱ्या वडिलांना हॉस्पीटलला सोडून स्पर्धेत  जाणं खूप कठीणं होतं

Updated: Aug 26, 2018, 03:47 PM IST
वडील कॅंसरशी लढतायत, मुलाने भारतासाठी 'सुवर्ण' आणलं title=

नवी दिल्ली : कॅंसरशी झुंजणाऱ्या वडिलांना हॉस्पीटलला सोडून स्पर्धेत  जाणं खूप कठीणं होतं पण तेजपाल सिंह या सर्वातून जात सुवर्ण जिंकून गेला. आशियाई स्पर्धेत २३ वर्षीय तेजिंदरने पाचव्या प्रयत्नात २०.७५ मीटर दूर गोळा फेकून नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत पहिल्या स्थानी झेप घेतली. यासोबतच त्याने ओम प्रकाश करहाना याचे रेकॉर्डही तोडलं. 

मला २१ मीटर पार करायचं होतं, सुवर्ण पदकाबद्दल मी विचार केला नव्हता पण यामुळे मी आनंदीत आहे असे तेजिंदरने सुवर्ण जिंकल्यानंतर सांगितले. गेले २-३ वर्षे मी राष्ट्रीय रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नात होतो जे स्वप्न आज पूर्ण झाल्याचेही त्याने सांगितले.

कॅंसरशी लढा

हा विजय माझ्यासोबतच माझ्या परिवारासाठीही महत्त्वाचा आहे. हा माझा सर्वात मोठा विजय आहे कारण मी यासाठी खूप त्याग केल्याचे तेजिंदरने सांगितले. 'गेली दोन वर्ष माझे वडील (करम सिंह) कॅंसरशी लढा देत आहेत पण माझ्या परिवाराने माझ लक्ष विचलित होऊ दिलं नाही. माझ स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिवार आणि मित्रांनी मोठा त्याग केला आणि या सर्वाचं फळ मिळालं', असेही तो सांगतो.

तेजिंदर पुढे म्हणतो, 'मला आता माझ्या वडिलांना भेटण्यासच दोन दिवस लागतील. मला आता पुढच्या आव्हानासाठी सज्ज व्हायचयं. माझे कोच एम.एस.ढिल्लो यांनादेखील याचे श्रेय द्यायला हवं, त्यांनी खूप मेहनत घेतली.'