'या' स्टार गोलंदाजाचं दमदार कमबॅक, T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये पुन्हा बदल होणार?

वर्ल्ड कपसाठी निवड झालेले टीम इंडियामधील प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या हंगामात अपयशी ठरत आहेत.   

Updated: Sep 30, 2021, 10:58 PM IST
'या' स्टार गोलंदाजाचं दमदार कमबॅक, T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये पुन्हा बदल होणार? title=

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर (IPL 2021) काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या 'रन'संग्रामाला 18 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपसाठीच्या प्रबळ दावेदार समजला जात आहे. मात्र या वर्ल्ड कपसाठी निवड झालेले टीम इंडियामधील प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या हंगामात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान या खेळाडूंच्या निराशजनक कामगिरीमुळे 10 ऑक्टोबरपर्यंत 15 सदस्यीय संघात बदल केला जाऊ शकतो. (team indian spinner yuzvendra chahal likely be comeback for t20 world cup 2021 squad due to good come back in ipl 2021)

... तर बदल होणार

टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या आधी यूएईत आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चाहर सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय. चाहरला टी 20 वर्ल्ड कपसाठी अनुभवी यूझवेंद्र चहलला वगळून चाहरला संधी देण्यात आली. मात्र चाहरची कामगिरी पाहता टीम इंडियामध्ये वर्ल्ड कपसाठी बदल करुन चहलला संधी दिली जाऊ शकते. 

चहलने असं केलं कमबॅक

बंगळुरुचा फिरकीपटू चहल म्हणाला की,  "मला माझ्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. ज्यामुळे मला विकेट्स घेण्यात मदत होते". बंगळुरुने 29 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला. या सामन्यात चहलने 4 ओव्हरमध्ये 4.50 च्या स्ट्राईक रेटने 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. चहलला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. चहलने या दुसऱ्या टप्प्यातील 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे बंगळुरुला सलग 2 सामने जिंकता आले.  

पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी

चहलसाठी आयपीएलचा 14 मोसमातील पहिला टप्पा हा फार खराब राहिला. त्यामुळेच चहलला टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आलं नाही. "पहिला टप्पा माझ्यासाठी फार खास राहिला नाही. त्यामुळे मी गोलंदाजीत कुठे चुकलो याबाबत सिनिअर खेळाडूंचा सल्ला घेतला. श्रीलंका दौऱ्यात मी कमबॅक केलं. मला वाटतं यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणं हे महत्त्वाचं असतं. मी इथे आयपीएलमध्ये त्याचाच वापर करतोय", असं चहलने स्पष्ट केलं.