तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, सीरिजही खिशात

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Dec 11, 2019, 10:59 PM IST
तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, सीरिजही खिशात title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत टीम इंडियाने ३ मॅचची ही सीरिज २-१ने जिंकली आहे. २४१ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये १७३/८ एवढाच स्कोअर करता आला, त्यामुळे टीम इंडियाचा ६७ रननी विजय झाला आहे.

टीम इंडियाने ठेवलेल्या २४२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. १२ रनवरच त्यांची पहिली विकेट गेली, यानंतर त्यांना वारंवार धक्के बसले. भारताकडून दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने ३९ बॉलमध्ये सर्वाधिक ६८ रन केले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. २० ओव्हरमध्ये टीम इंडियाने २४०/३ एवढा स्कोअर केला. रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन्ही ओपनरनी भारताला वादळी सुरुवात करुन दिली. रोहित आणि राहुल यांच्यात ११.४ ओव्हरमध्ये १३५ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली.

रोहित शर्मा ३४ बॉलमध्ये ७१ रन करुन आऊट झाला, तर ऋषभ पंत शून्य रनवर माघारी परतला. केएल राहुलने ५६ बॉलमध्ये सर्वाधिक ९१ रनची खेळी केली. विराट कोहलीने २९ बॉलमध्ये नाबाद ७० रन केले. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कॉट्रेल, केसरिक विलियम्स आणि कायरन पोलार्डला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये विजय झाल्यानंतर तिरुवनंतपुरमच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता.