Team India: Rohit Sharma ने टी-20 चं कर्णधारपद का सोडलं पाहिजे? 3 प्रमुख कारणं समोर

टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ज्यानंतर रोहित शर्मावरच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज रोहितला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देतायत.

Updated: Nov 18, 2022, 04:03 PM IST
Team India: Rohit Sharma ने टी-20 चं कर्णधारपद का सोडलं पाहिजे? 3 प्रमुख कारणं समोर title=

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 world cup) मध्ये सेमीफायनलमध्ये (semifinal) इंग्लंडने टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ज्यानंतर रोहित शर्मावरच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज रोहितला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देतायत. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik pandya) सोपवली जाऊ शकते.  

रोहित शर्माने को सोडलं पाहिजे कर्णधारपद? 

रोहित शर्मा आता 35 वर्षांचा झाला आहे. अशातच किक्रेटमधील दिग्गज व्यक्तींच्या म्हणण्यानुसार टीम इंडियासाठी एक युवा टी 20 कर्णधार असला पाहिजे. जो 2024 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकू शकतो. रोहित शर्माने टी-20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपदं सोडलं पाहिजे. यामागे 3 मोठी कारणं आहेत, पाहूयात ही कारणं कोणती.

1. रोहित शर्माचा फिटनेस

रोहित शर्माच्या फिटनेसची समस्या ही टीम इंडियासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. रोहित शर्मा आता 35 वर्षांचा असून तो आता हळू-हळू त्याच्या करियरच्या अंतिम टप्प्यात आला आहे. रोहित शर्मा सतत 3-4 महिन्यांनी क्रिकेटपासून ब्रेक घेत असतो. रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि भारताच्या तिन्ही फॉरमॅटचाही कर्णधार आहे. त्यामुळे रोहित शर्मावर कर्णधारपदाचं दडपण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा स्थितीत रोहित शर्माने टी-20 कर्णधारपदावरून मुक्त होऊन हार्दिक पांड्याकडे कमान सोपवली पाहिजे.

2. T20 मध्ये खराब फॉर्म

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये एकदाच 50 रन्स केलेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्डकपमध्येही 2022 मध्ये रोहितने 6 सामन्यांमध्ये 116 रन्स केलेत. यादरम्यान रोहित शर्माचा स्ट्राईक रेटही खूपच खराब दिसून आला. रोहित शर्माने 2022 च्या T20 वर्ल्डकपमध्ये 106.42 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केलीये.

3. हार्दिक पांड्याचा दावा कर्णधारपदासाठी मजबूत

T20 कर्णधार बनण्याच्या शर्यतीत हार्दिक पंड्या रोहित शर्मावर दिवसेंदिवस वरचढ ठरताना दिसतोय. पुढच्या T20 वर्ल्डकप 2024 मध्ये होणार आहे. ही बाब लक्षात घेता बीसीसीआय रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला नवा T20 कर्णधार बनवण्याच्या मनस्थितीत दिसून येतेय.