Team India | टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून देणारा 32 वर्षांचा खेळाडू निवृत्ती घेणार?

टीम इंडियात (Team India)  निवड होण्यापेक्षा संघातील स्थान कायम ठेवणं हे फार आव्हानात्मक असतं.   

Updated: Feb 27, 2022, 10:01 PM IST
 Team India | टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून देणारा 32 वर्षांचा खेळाडू निवृत्ती घेणार? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडियात (Team India)  निवड होण्यापेक्षा संघातील स्थान कायम ठेवणं हे फार आव्हानात्मक असतं. अनेक खेळाडू येतात आणि जातात. स्पर्धा इतकी वाढली आहे की, संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी चमकदार कामगिरी करावीच लागते. अन्यथा संघातील स्थान गमावलंच समजा. मात्र असेही काही खेळाडू आहेत ज्यांना संधीच मिळत नाही. टीम इंडियाच्या अशाच एका क्रिकेटरची कारकिर्द ही अंधारात आहे. (team india star batsman manish pandey cricket career in denger)

टीम इंडियाचा मनीष पांडे (Manish Pandey) गेल्या अनेक महिन्यांपासून अपयशी ठरतोय. मनीषला अनेकदा संधी देण्यात आली. मात्र त्याला त्या संधीचं सोनं करता आली नाही.
 
कारकिर्द संपली?

मनीषने 39 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 44.31 च्या एव्हरेजने आणि 126.15 च्या स्ट्राईक रेटने 709 धावा केल्या आहेत. मनीषला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. त्यामुळे मनिषला संधीपेक्षा अधिक डच्चूच वारंवार मिळत राहिला. 

त्यामुळे आता मनिषला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच मनिष आयपीएलच्या 14 व्या मोसमातही अपयशी ठरला होता.