तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये. 

Updated: Aug 11, 2017, 09:07 PM IST
तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत title=

कँडी: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये. 

तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या जागी चायनामन कुलदीप यादवला संधी मिळणार असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिलेत. जडेजाला तिसऱ्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्यानं 

सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने कुलदीप खेळण्याबाबतचे संकेत दिलेत. विराट म्हणाला, कुलदीप कोणत्याही परिस्थिती गोलंदाजी करु शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत त्याने स्वत:ला सिद्ध केले होते. उद्यापासून सुरु होणाऱ्या सामन्यात त्याला खेळण्याची चांगली संधी आहे. 

जडेजावर एका सामन्याची बंदी घालण्यात आल्याने त्याच्या जागी कुलदीपला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.