Team India : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ (Team India) आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत (India vs Ireland t20i Series) भिडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे असून अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात पहिल्यांदाच एका घातक फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. IPL 2022 या फलंदाजाने आपल्या बॅटने दहशत पसरवली होती.
आयर्लंड मालिकेसाठी टीम इंडियात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यापैकीच एक नाव म्हणजे राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi). राहुलची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) राहुल त्रिपाठीने आपली छाप उमटवली होती. पण यानंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड झाली नाही. यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
IPL 2022 मध्ये राहुल त्रिपाठीने दमदार कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 14 सामन्यांत 414 धावा केल्या. त्याच्या नावावर 3 अर्धशतकांचाही नोंद आहे. राहुलची कामगिरी प्रत्येक मोसमात अप्रतिम राहिली आहे. त्यामुळे राहुलला लवकरच टीम इंडियाकडून खेळताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहतेही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर चाहत्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
टीम इंडियाचा नवा कर्णधार
टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय (bcci) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत टीम इंडियाला आणखी एक नवा कर्णधार मिळाला आहे. हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसनची (Sanju Samson) टीममध्ये एन्ट्री झाली आहे. श्रेयस अय्यरला मात्र वगळण्यात आलंय.
आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.