टीम इंडिया आयसीसी क्रमावारीत अव्वल

टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 24, 2017, 10:08 PM IST
टीम इंडिया आयसीसी क्रमावारीत अव्वल title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने तिसऱ्या वनडेमध्ये दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात टाकली आहे. या विजयानंतर टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. 

टीम इंडिया १२० च्या रेटिंगने पहिल्या स्थानी आहे. ४८ सामन्यात टीम इंडियाचे ५७६४ पॉईंट्स झाले आहेत. साऊथ आफ्रिका ११९ रेटींगसह दुसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकेचे ५० मॅच मध्ये ५९५७ पॉईंट्स झाले आहेत. ऑस्ट्रेलिया ११३ रेटिंग्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. ५० मॅचमध्ये ५७०९ पॉईंट्स झाले आहेत. या रॅंकिंगमध्ये इंग्लंड चौथ्या, न्यूझीलंड पाचव्या तर पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे.