Ind vs Pak : पाकिस्तान विरुद्ध अशी असेल टीम इंडिया, पाहा कोणाला मिळणार संघात स्थान

भारत पाकिस्तानविरुद्ध (India vs pakistan) उद्या पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल. याबाबत क्रिकेट चांहत्यांमध्ये देखील उत्सूकता आहे.

Updated: Oct 23, 2021, 04:11 PM IST
Ind vs Pak : पाकिस्तान विरुद्ध अशी असेल टीम इंडिया, पाहा कोणाला मिळणार संघात स्थान title=

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2021 चा बहुचर्चित सामना रविवार 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. या सामन्याने दोन्ही संघ स्पर्धेला सुरुवात करणार आहेत. फॉर्मात असलेल्या शार्दुल ठाकूर आणि इशान किशन यांच्या जागी कोणते खेळाडू बसवायचे, ही कर्णधार विराटसमोर अडचण आहे. तसेच अश्विन आणि वरुण चक्रवर्ती यांच्यातही एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. या सामन्यातील भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया.(Team India predicted playing XI against pakistan in T20 world cup 2021)

कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या सराव सामन्यातच खात्री केली होती की केएल राहुल रोहित शर्मासह डावाची सलामी देईल. अशा परिस्थितीत हीच स्फोटक जोडी पाकिस्तानविरुद्ध सलामीला जाणार आहे.

मधल्या फळीत कोहली, सूर्यकुमार, पंत

तिसऱ्या स्थानावर कर्णधार कोहली स्वतः फलंदाजीची जबाबदारी घेईल, त्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत चौथ्या स्थानावर येईल.

हार्दिक पंड्या आणि जडेजा अष्टपैलू

रोहित शर्माने दुसऱ्या सराव सामन्यात म्हटले होते की, हार्दिक स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी गोलंदाजीला सुरुवात करेल. अशा परिस्थितीत तो पाकिस्तानविरुद्ध किमान दोन ओव्हर चरी गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे. रवींद्र जडेजा अव्वल फॉर्ममध्ये आहे आणि तो अष्टपैलू म्हणून पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरू शकतो.

अश्विन किंवा वरुण 

प्रदीर्घ काळानंतर टी-20 संघात पुनरागमन करणाऱ्या आर अश्विनसाठी दुबईची खेळपट्टी उपयुक्त ठरू शकते. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही समाविष्ट केले जाऊ शकते. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत प्रभावित केले आहे, त्यामुळे अश्विनच्या जागी त्याला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरवले जाऊ शकते.

शमी, बुमराह आणि भुवी

भारताच्या तीन अनुभवी वेगवान गोलंदाजांना पाकिस्तानविरुद्ध पाहिले जाऊ शकते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना भुवनेश्वर कुमारची साथ मिळेल. तसे, अनेक माजी क्रिकेटपटूंनी भुवीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते असे सुचवले आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह