Team India चा 'हा' खेळाडू बोहल्यावर चढला

क्रिकेटरवर शुभेच्छांचा वर्षाव 

Updated: Feb 17, 2021, 10:14 AM IST
Team India चा 'हा' खेळाडू बोहल्यावर चढला  title=

मुंबई : टीम इंडियाकरता इंटरनॅशनल सामने खेळलेला ऑफ स्पिनर ऑलराऊंडर जयंत यादव (Jayant Yadav) हा लग्नबंधनात अडकला आहे. जयंत यादवने आपली गर्लफ्रेंड दिशा चावला (Disha Chawla) सोबत सात फेरे घेतले आहेत. जयंत यादवने इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लग्नाची माहिती चाहत्यांना दिली आहे. जयंत यादवने भारताकरता 4 टेस्ट मॅच आणि वन डे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jayant Yadav (@jyadav19)

जयंत यादवने ऑक्टोबर 2016 मध्ये भारताकरता इंटरन्रॅशनल क्रिकेटमधून डेब्यू केला आहे. जयंत यादव 14 आयपीएल सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ने सोशल मीडियावर जयंत यादवच्या लग्नाची माहिती शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

जयंत यादव आणि दिशा चावलाने 2019मध्ये साखरपुडा केला. काही दिवसांत अनेक भारतीय क्रिकेटर्सने लग्न आणि साखरपुडा केला आहे. काही दिवसांपूर्वी जयदेव उनादटकने देखील आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. आयपीएल 2020मध्ये धमाल करणाऱ्या राहुल तेवतियाने साखरपुडा केला आहे. टीम इंडियाने स्पिनर युजवेंद्र चहलने देखील डिसेंबर 2020 मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न केलं आहे. 

जयंत यादवने भारताकरता 2016 मध्ये डेब्यू केलं आहे. जयंत यादवच्या नावे एक शतक नोंदवलं आहे. जयंत यादवने 2016 मध्ये इंग्लंड विरूद्ध मुंबई सामन्यात 104 धावा केल्या आहेत. जयंत यादवने 9 नंबरवर फलंदाजी केली आहे.