टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची क्रिकेट कारकिर्द धोक्यात, पाहा कोण आहे तो?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 4 मार्चपासून कसोटी मालिका (IND vs SL Test Series 2022) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे.

Updated: Mar 1, 2022, 09:33 PM IST
टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची क्रिकेट कारकिर्द धोक्यात, पाहा कोण आहे तो? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 4 मार्चपासून कसोटी मालिका (IND vs SL Test Series 2022) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवचं कमबॅक झालं आहे. तर विराट कोहलीचा श्रीलंका विरुद्धचा पहिला सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना असणार आहे. (team india mumbaikar star player suryakumar yadav has not be given chance to test debut)

या सामन्यासह रोहितची कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे. मात्र  श्रीलंका विरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. 

निवड समितीने मुंबईकर सूर्यकुमार यादवची या कसोटी मालिकेसाठी निवड केलेली नाही. सूर्युकुमार यादव (Suryakumar Yadav)  अनेक महिन्यांपासून सातत्याने जोरदार धमाकेदार कामगिरी करतोय. 

त्यामुळे सूर्याला या कसोटी मालिकेसाठी संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र निवड समितीने सूर्याची निराशाच केली. यामुळे सूर्याची कसोटी कारकिर्द ही सुरु होण्याआधीच संपली का, असंही म्हटलं जात आहे. 

सूर्यकुमारची इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली होती. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यानंतर सूर्याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठीही निवडण्यात आलं होतं. मात्र यावेळेसही सूर्याच्या पदरी निराशाच पडली. 

सूर्याला न्यूझीलंड विरुद्धही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. आता श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही सूर्याला डच्चू देण्यात आला. त्यामुळे सूर्यकुमारच्या कसोटी कारकिर्दीला ग्रहण लागलंय का, असा सवाल या निमित्ताने विचारला जातोय.  
 
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.