Women's World Cup 2022 | प्राईज मनीमध्ये दुप्पट वाढ, वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल

आयसीसी वूमन्स वनडे क्रिकेट वर्ल्ड कप (Icc Women's World Cup 2022) स्पर्धेचं आयोजन हे 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान करण्यात आलं आहे.

Updated: Mar 1, 2022, 09:06 PM IST
Women's World Cup 2022 | प्राईज मनीमध्ये दुप्पट वाढ, वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल title=
छाया सौजन्य : आयसीसी

मुंबई : आयसीसी वूमन्स वनडे क्रिकेट वर्ल्ड कप (Icc Women's World Cup 2022) स्पर्धेचं आयोजन हे 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे न्यूझीलंमधील 6 ठिकाणी करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ वर्ल्ड कपसाठी आमनेसामने भिडणार आहेत. आयसीसीची ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. एकूण 8 पैकी पहिले 4 संघ हे सेमी फायनलमध्ये पोहचणार आहेत. (icc womens odi world cup  2022  prize money know how much  money will get winner team runner up teams) 

आयसीसीने यंदा या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवर पैशांची लयलूट (Icc Womens World Cup Prize Money) केली आहे. वर्ल्ड कप जिंकणारी टीम मालामाल होणार आहे. आयसीसीने 2017 च्या वर्ल्ड कपच्या तुलनेत प्राईज मनीमध्ये दुप्पटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. तसेच प्रत्येक सामना जिंकणाऱ्या टीमलाही खोऱ्याने पैसे मिळणार आहेत.

वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमपासून ते प्रत्येक टीम मालामाल होणार आहे. नक्की कोणाला किती रक्कम मिळणार हे आपण जाणून घेऊयात.

आयसीसीचा 'डबल धमाका'

आयसीसी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला देण्यात येणाऱ्या रक्कमेत दुप्प्टीने वाढ केली गेली आहे. या वेळेस वर्ल्ड कप विनर टीमला 1.32 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच 9 कोटी 90 लाख रुपये मिळणार आहेत.   

उपविजेत्या टीमला किती मिळणार?  

उपविजेत्या संघाला 6 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच 4 कोटी 50 लाख रुपये मिळणार आहेत. तर सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या टीमला 3 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच 2 कोटी 25 लाख रुपये मिळतील. 

तसेच साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला प्रत्येकी 52 कोटी 55 लाख रुपये मिळतील. तर साखळी फेरीतील प्रत्येकी सामना जिंकल्यास 18 लाख 76 हजार रुपये मिळतील.

टीम इंडियांचं वेळापत्रक (Womens One Day World Cup 2022 Team India Schedule)

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान - 6 मार्च

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड - 10 मार्च

टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज -12 मार्च

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड -16 मार्च

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया -19 मार्च

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश - 22 मार्च

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 27 मार्च

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.