रोहितच्या नेतृत्वामध्ये धोनीच्या खास खेळाडूचं करिअर धोक्यात?

रोहितच्या नेतृत्वामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या खास खेळाडूला संधी मिळेना, संन्यास घेण्याच्या तयारीत? 

Updated: Mar 21, 2022, 05:14 PM IST
रोहितच्या नेतृत्वामध्ये धोनीच्या खास खेळाडूचं करिअर धोक्यात? title=

मुंबई : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. सध्याची स्थिती पाहता केव्हाही तो संन्यास घेण्याची घोषणा करू शकतो अशी शक्यता आहे. बीसीसीआय या खेळाडूला कोणताही भाव देत नसल्याचं दिसत आहे. शिवाय रोहितच्या नेतृत्वात संधी मिळणंही कमी झालं आहे. स्पर्धा वाढल्याने या खेळाडूला संधी कमी मिळत आहे. 

धोनीचा खास खेळाडू असल्याने धोनी आणि माजी कर्णधार विराट कोहलीने या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये चांगली संधी दिली होती. हा खेळाडू केव्हाही संन्यास घेण्याबाबत घोषणा करू शकतो.

एक वेळ अशी होती की या खेळाडूला धोनीचा खास म्हणून ओळखला जायचा. ईशांत शर्माचं करिअर सध्या धोक्यात आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देत नाही. 2013 मध्ये त्याने एका ओव्हरमध्ये इंग्लंड विरुद्ध बाजी पलटवली होती. त्याने भारताला मोठा विजय मिळवून दिला होता. 

लवकरच संन्यास घेण्याची शक्यता

सध्या टीम इंडियामध्ये शमी, बुमराह, सिराज यासोबत काही नवख्या चेहऱ्यांना सतत संधी दिली जात आहे. मात्र ईशांत शर्माला कोणताही भाव दिला जात नाही. शार्दुल ठाकूर, उमेश यादवला मॅनेजमेंटनं पसंती दिली आहे. त्यामुळे ईशांतकडे दुर्लक्ष होतं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लवकरच ईशांत संन्यास घेऊ शकतो अशी चर्चा आहे. 

ईशांत शर्माला आता टीम इंडियात स्थान मिळणार नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याचा फॉर्मही विशेष चांगला नाही. ईशांत शर्मा शेवटचा सामना नोव्हेंबर 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसला होता. त्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर 3 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 विकेट घेता आल्या. 

आता ईशांतला प्रतिस्पर्धा खूप मोठी आहे शिवाय रोहित शर्मा अनेक नव्या खेळाडूंना संधी देत आहे. त्यामुळे ईशांत शर्माला अगदी हळूच बाजूला करण्यात आलं आहे. या सगळ्यामुळे तो लवकरच संन्यास घेऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. याबाबत ईशांत शर्माने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.