Sunil Gavaskar On Team India Senior Players: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा टी20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup 2022) प्रवास संपला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) सेमीफायनल (Semi Final) गाठली खरी, पण फायनल गाठण्यात ते अपयशी ठरले. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा 10 विकेटने पराभव करत फायनल गाठली. टीम इंडियाच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचे महान क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सुनील गावसकर यांनी केलेल्या दाव्यानुसार टीम इंडियातील काही सिनिअर खेळाडू (Team India Senior Players) निवृत्ती घेऊ शकतात.
गावसकर यांच्या वक्तव्याने खळबळ
सुनील गावसकर यांनी केलेल्या दाव्यानुसार रोहित शर्मा लवकरच टी20 संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होऊ शकतो. रोहित शर्माने कर्णधार पद सोडल्यानंतर संघाची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपावली जाऊ शकते. आयपीएलमध्ये (IPL) कर्णधारपद स्विकारल्यानंतर हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे टी20 संघाचा कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरू शकतो.
'काही खेळाडू सन्यास घेणार'
हार्दिक पांड्या भविष्यात भारतीय टी20 संघाचं नेतृत्व सांभाळू शकतो, तसंच काही खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात असं गावसकर यांनी म्हटलं आहे. भारतीय टीममधले काही खेळाडू 30 ते 40 वयोगटातील आहेत जे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या वाटेवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) यांच्यासाठी टी20 वर्ल्ड कपमधली कामगिरी निराशाजनक ठरली आहे. आर अश्विन आणि दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 नंतर टीम इंडियात पदार्पण केलं. पण टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही. आता आगामी मालिकेतही अश्विन आणि दिनेश कार्तिकला संधी देण्यात आलेली नाही.