वर्ल्ड कपमध्ये हुकमी गोलंदाज असतानाही खेळवलं नाही, शेवटी धक्का बसलाच!

वर्ल्डकपमध्ये विराटच्या कॅप्टनसीमध्ये हुकमी गोलंदाज असलेल्या खेळाडूला एकाही सामन्यात घेतलं नाही.  

Updated: Nov 10, 2022, 11:30 PM IST
वर्ल्ड कपमध्ये हुकमी गोलंदाज असतानाही खेळवलं नाही, शेवटी धक्का बसलाच! title=

Ind vs  Eng : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर झाला आहे. (Ind vs Eng Semi Final 2022) सेमी फायनल सामन्यामध्ये भारतावर इंग्लंड संघाने 10 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र आता संघाला रिकाम्या हाताने माघारी यावं लागणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत काही खेळाडूंना बेंचवर बसावं लागलं. यामध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा त्याच्या कॅप्टनसीमध्ये हुकमी एक्का असलेल्या खेळाडूचा समावेश आहे. (Trending ind vs eng 2022 Yuzvendra Chahal was not played in the match in the World Cup sport marathi news)

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्सचा (RCB) माजी कर्णधार माजी विराट कोहलीचा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हुकमी गोलंदाज होता. चहलने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांचा निकाल बदलला होता. 2021 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येही चहलला वगळण्यात आलं होतं. तर यंदा चहलला घेण्यात आलं मात्र एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. 

युजवेंद्र चहलच्या जागी आर. आश्निनला खेळवण्यात आलं होतं. मात्र या स्पर्धेमध्ये आश्विनला त्याच्या अनुभवाला साजेशी कामगिरी करता आली नाही. किमान आजच्या सामन्यात तरी चहलला संधी मिळेल असं सर्वांना वाटत होती मात्र आजही त्याला घेण्यात आलं नाही. आजही आश्विनची कामगिरी दमदार राहिली नाही. 

आश्विनच्या नाहीतर किमान अक्षर पटेलच्या जागी तरी त्याला संघामध्ये खेळवण्यात यायला हवं होतं. 6 मॅचमध्ये आश्विनने 6 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याचं सर्वोत्तम प्रदर्षण हे  3 विकेट्स आहे. एकंदरित तसं पाहायला गेलं तर चहलला संधी द्यायला हवी होती.