मुंबई : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत 3 कसोटी आणि 3 वनडे मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मुंबईहून रवाना झाली आहे. बीसीसीआयने संघाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये कर्णधार विराट कोहली दिसत नाहीये.
बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या फ्लाइटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. BCCI ट्विटवर 4 फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ज्यात जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव दिसतायत. पण BCCI च्या या फोटोंमध्ये विराट कोहली दिसत नाहीये.
All buckled up
South Africa bound #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/fCzyLzIW0s
— BCCI (@BCCI) December 16, 2021
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 39 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 39 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 15 सामने जिंकले असून भारताने 14 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी कर्णधार कोहली म्हणाला की, त्याठिकाणी काहीतरी विशेष कामगिरी करून मालिका जिंकणं महत्त्वाचं आहे.