टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणे कठीण

Cricket News : इंग्लंडविरुद्ध ( England) उद्यापासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी (Test Cricket) टीम इंडियाला (, India) मोठा धक्का बसला आहे.  

Updated: Aug 11, 2021, 10:55 AM IST
टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणे कठीण  title=

मुंबई : Cricket News : इंग्लंडविरुद्ध ( England) उद्यापासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी (Test Cricket) टीम इंडियाला (, India) मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे कठीण आहे. शार्दुल ठाकूर हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त आहे. अशा स्थितीत तो दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर पडू शकतो.

टीम इंडियाला मोठा धक्का

'इनसाइड स्पोर्ट'नुसार शार्दुल ठाकूर खेळला नाही तर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळू शकते. विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे की भारत या मालिकेत 4 वेगवान गोलंदाजांसह खेळेल. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूर याच्या जागी इशांत शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

शार्दुल ठाकूर टीम इंडियातून बाहेर पडणे हा मोठा धक्का ठरू शकतो. कारण तो फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही माहीर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने त्याची झलक दाखवली होती. शार्दुल ठाकूर याने इंग्लंडविरुद्ध अनिर्णित पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी केली. शार्दुल ठाकूरने दोन्ही डावांमध्ये चार विकेट घेतल्या.

पहिल्या कसोटी चांगली कामगिरी

शार्दुल ठाकूर याने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटला पहिल्या डावात बाद करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. शार्दुल ठाकूर याने या सामन्यात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत चांगला खेळ केला. नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी जिंकून भारताला 1-0 अशी आघाडी घ्यायची आहे.

इंग्लंडलाही मोठा धक्का बसला

इंग्लंडचा स्टार बॉलर स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाला आहे. प्रशिक्षणादरम्यान तो जखमी झाला आहे. आज बुधवारीत्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. स्टुअर्ट ब्रॉड कदाचित मालिकेच्या उर्वरित 4 सामन्यांमधून बाहेर असेल. लॉर्ड्सची कसोटी ब्रॉडच्या कारकिर्दीतील 150 वा कसोटी सामना होता, पण आता त्याला वाट पाहावी लागेल, असे दिसत आहे. ब्रॉड टीममधून वगळा गेल्यास मार्क वुडला 11 खेळाडूत  संधी दिली जाऊ शकते.