मुंबई : इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचा (T20 World Cup 2022) कारनामा केला. इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवत पाकिस्तानला दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून रोखलं. या संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान अनेक मिस्ट्री गर्ल्स (Mystery girl) आणि स्टेडियममधील विनोदी व्हीडिओ व्हायरल झाले. आपल्या कॅमेऱ्यात मिस्ट्री गर्लला अचूक टिपणाऱ्या कॅमेरामॅनचंही सोशल मीडियावर (Social Media) कौतुक केलं गेलं. मात्र तो कॅमेराच्या मागे असलेल्या चेहऱ्याला कोणीच ओळखत नाही. या कॅमेऱ्यामागे राहून दुसऱ्यांना फेमस करणाऱ्या कॅमेरामॅनला टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाणने शोधून काढलंय. इरफानने या कॅमेरामॅनसोबतचा व्हीडिओ शेअर केलाय. (team india former cricketer irfan pathan reveld cameraman who capture mystery girls in camera)
इरफानने या मिस्ट्री कॅमेरामॅनला व्हीडिओमध्ये कैद केलंय. या कॅमेरामॅनचं नाव प्रसन्ना प्रधान आहे. "हा तोच पठ्ठ्या आहे जो लोकांना व्हायरल करतो", असा मेसेज या व्हीडिओवर पहायला मिळतोय. तसेच त्या माणसाला शोधून काढलंच असं कॅप्शन इरफानने या व्हीडिओ दिलंय. मात्र दुसऱ्या बाजूला मी असं काही करत नाही, असं हा कॅमेरामॅन या व्हीडिओत आपल्या कृतीतून सांगताना दिसतोय.
दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंडला रवाना होणार आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.