जबरदस्त! अखेर टीम इंडियाला मिळाला नवा विराट कोहली, पाहा कोण आहे तो?

टीम इंडियाला मिळाला विराट कोहलीचा डुप्लीकेट, पाहा कोण आहे तो क्रिकटपटू ...

Updated: Mar 7, 2022, 01:59 PM IST
जबरदस्त! अखेर टीम इंडियाला मिळाला नवा विराट कोहली, पाहा कोण आहे तो?  title=

नवी दिल्ली : टीम इंडियामध्ये सध्या कर्णधार रोहित शर्मा सगळ्या नव्या खेळाडूंना संधी देत आहे. अनुभवी खेळाडू टीम इंडियामध्ये सध्या कमी उतरले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

संघाची बांधणी करण्याचा विचार येतो तेव्हा सहाजिकच रणजी ट्रॉफीवर सर्वांच्या नजरा जातात. याचं कारण म्हणजे अनेक स्टार खेळाडूंची सुरुवात रणजी ट्रॉफीतून झाली आहे. रणजीतील धडाकेबाज कामगिरीनंतर टीम इंडियासाठी त्यांना दरवाजे उघडे झाले. आता विराट कोहलीची कॉपी असणारा एक खेळाडू मिळाला आहे. 

रणजी ट्रॉफीमध्ये 19 वर्षांचा हा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्या त्याच्या फॉर्मची चर्चा आहे. टीम इंडियामध्येच नाही तर संपूर्ण जगात आपलं वेगळी ओळख निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न आहे. यश धुल असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. 

अंडर 19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार यश धुल रणजी ट्रॉफीमध्ये सतत चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. 19 वर्षीय फलंदाजाने आपल्या तिसऱ्या रणजी सामन्यात द्विशतक झळकावून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. यश धुलने रणजी ट्रॉफी 2022 च्या मोसमात दिल्लीसाठी शानदार खेळ दाखवला आणि त्याचा पहिला हंगाम अविस्मरणीय बनवला. 

पहिल्या सामन्यात 29 धावा करून तो आऊट झाला होता. दुसऱ्या डावात कमालीची फलंदाजी करत द्विशतक झळकवलं. 261 बॉलमध्ये 200 धावा केल्या. यामध्ये त्याने 26 चौकार ठोकले

यश धुलचा आयपीएल ऑक्शनमध्ये देखील जलवा पाहायला मिळाला होता. दिल्ली संघाने त्याला 50 लाख रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं होतं. दिल्लीव्यतिरीक्त पंजाबनेही बोली लावली होती. आता IPL 2022 मध्ये त्याच्या कामगिरीकडेही लक्ष लागलं आहे.