Jasprit Bumrah Injurey : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट

जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) खेळणंही अवघड असल्याचं दिसून येतंय. 

Updated: Oct 1, 2022, 10:37 PM IST
Jasprit Bumrah Injurey : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट title=

मुंबई :  जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) खेळणार की नाही, याबाबत काही नक्की नाही. बुमराहच्या मेडीकल रिपोर्टच्या खोलवर न जाता आम्ही ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो खेळणार की नाही, याबाबतच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा करु, असं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) शनिवारी सांगितले. बुमराह नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला होता. तसंच बुमराहचं टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणंही अवघड असल्याचं दिसून येतंय. (team india coach rahul dravid give big update of jasprit bumrah injurey)

द्रविड काय म्हणाला? 

“आम्ही आता अधिकृत घोषणेची वाट पाहत आहोत. बुमराह आतापर्यंत अधिकृतपणे आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे. पुढच्या काही दिवसात काय होते ते बघू. साधारणपणे स्ट्रेस फ्रॅक्चर'मधून सावरण्यासाठी 6 महिने लागतात.  बुमराह दुखापतीतून सावरेल अशी आम्हाला आशा आहे, असं द्रविड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यापूर्वी म्हणाला. 

"खरं सांगायचे तर मी बुमराच्या मेडिकल रिपोर्टमध्ये खोलवर गेलो नाही. बुमराहला काय झालंय ते त्यातील तज्ज्ञ सांगतील, मी तज्ञांवर अवलंबून आहे. जोवर बुमराह अधिकृतरित्या टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर झालाय असं जाहीर होत नाही, तोवर आम्हाला आशा असेल,"असंही द्रविडने स्पष्ट केलं.