IND vs WI: वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा प्रयोग फसला, इवलुश्या धावसंख्येसमोर रडत रडत विजय!

India beat West Indies by 5 wickets: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्यात भारताने विंडीजचा 114 रन्समध्ये ऑलआऊट केला. भारताला जिंकण्यासाठी 115 रन्सची गरज असताना टीम इंडियाने प्रयोग केले.

सौरभ तळेकर | Updated: Jul 28, 2023, 12:06 AM IST
IND vs WI:  वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा प्रयोग फसला, इवलुश्या धावसंख्येसमोर रडत रडत विजय! title=
India beat West Indies by 5 wickets 1st ODI

West Indies vs India, 1st ODI:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. प्रयोगाचा खेळ करत टीम इंडियाने 5 गडी राखून विजय नोंजवला आहे. वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 114 धावा करू शकता. त्यानंतर भारतीय फलंदाजीमध्ये वेगळं रुप पहायला मिळालं. त्यामुळे आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची चर्चा होताना दिसत आहे.

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्यात भारताने विंडीजचा 114 रन्समध्ये ऑलआऊट केला. भारताला जिंकण्यासाठी 115 रन्सची गरज असताना टीम इंडियाने प्रयोग केले. सलामीसाठी नेहमी उतरणारा रोहित शर्मा डगाआऊटमध्ये बसून राहिला. तर ईशान किशन आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आली. मात्र, शुभमन गिलला खास कामगिरी करता आली नाही. तो 7 धावा करत लवकर बाद झाला. त्यानंतर विराट मैदानात येईल, अशी शक्यता होती. मात्र, सूर्यकुमार यादव मैदानात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या गेल्या.

शार्दुलला बॉल खेळायचा नव्हता पण बॉल खेळल्यामुळे त्याला बाद देण्यात आला. त्यानंतर आता सलामीला येणारा रोहित शर्मा 7 व्या क्रमाकाच्या फलंदाजाच्या रुपात मैदानात आला आहे. तर विराटला मैदानात उतरण्याची गरज पडली नाही. टीम इंडियाचे पाच विकेट गेल्यानंतर रोहित आणि जडेजाने सामना अखेर संपवला. 23 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला. 

आणखी वाचा - IND vs WI: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ पत्त्यासारखा कोसळला. वेस्ट इंडिजच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. शेई होप याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर भारताकडून कुलदीप यादवने 3 ओव्हरमध्ये 6 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 6 ओव्हरमध्ये 37 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याचबरोबर हार्दिक, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूरने 1-1 विकेट घेतल्या.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.