टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा खेळ खल्लास?

टीम इंडियाच्या एका उत्तम खेळाडूची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा आहे.

Updated: Feb 9, 2022, 11:18 AM IST
टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा खेळ खल्लास? title=

मुंबई : अनेक नवे खेळाडू टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. अशातच कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवायचा हा प्रश्न मॅनेजमेंट समोर असतो. मात्र असं असतानाही टीम इंडियाच्या एका उत्तम खेळाडूची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा आहे. बीसीसीआयच्या एका मोठ्या अपडेटवरून असं स्पष्ट होतंय की, या खेळाडूकडे आता केवळ रिटायरमेंटचाच पर्याय आहे.

टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने सिलेक्टर्सना सर्वोत्तम विकेटकीपरपैकी एक असलेला 37 वर्षीय वृद्धीमान साहा याची मार्चपासून श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड होणार नसल्याचं सांगितंल असल्याची चर्चा आहे.

या खेळाडूचं करियर संपलं

ऋषभ पंत हा इंडियन टीम मॅनेजमेंटचा आवडता विकेटकीपर आहे. याबाबत एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, "टीम मॅनेजमेंटमधील काही लोकांनी रिद्धिमान साहाला स्पष्टपणं सांगितलंय की, त्यांना पुढचा विचार करायचा आहे आणि ऋषभ पंतसोबत काही नवीन बॅक-अप तयार करायचेत." 

बीसीसीआयच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, "श्रीलंका कसोटी मालिकेसाठी के.एस. भरतला संधी घेण्याची वेळ असल्याने त्याला श्रीलंका कसोटी मालिकेसाठी निवडलं जाणार नाही, असं ऋद्धिमान साहाला समजावून सांगण्यात आलं." 

कदाचित याच कारणामुळे रणजी करंडक खेळणार नसल्याचं ऋद्धिमानने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष अभिषेक दालमिया आणि संयुक्त सचिव स्नेहाशिष गांगुली यांना कळवलं आहे.

साहाने भारतासाठी 40 कसोटीत 3 शतकांच्या मदतीने 1353 रन्स केले आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 30 पेक्षा कमी होती. मात्र, त्याने 92 कॅचेस आणि 12 स्टंपिंगसह विकेटच्या मागे एकून 104 बळी घेतलेत.