टीम इंडियाचा हा खेळाडू कॉलेजमध्ये सिनिअर मुलीच्या पडला होता प्रेमात

कॉलेजमधल्या मैत्रिणीला 4 वर्ष डेट केल्यानंतर त्याने लग्नाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Sep 15, 2022, 07:39 PM IST
टीम इंडियाचा हा खेळाडू कॉलेजमध्ये सिनिअर मुलीच्या पडला होता प्रेमात title=

मुंबई : टीम इंडियाचा फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यांने नुकतीच सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रॉबिन उथप्पा 2015 पासून भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहत होता. पण त्याला संधी मिळाली नाही. रॉबिन उथप्पाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला रॉबिनच्या रंजक प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत. 36 वर्षीय रॉबिन उथप्पाने 3 मार्च 2016 रोजी शीतल गौतम (Sheethal Goutham) सोबत लग्न केले. बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रॉबिन उथप्पाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

शीतल गौतम आणि रॉबिन (Sheethal Goutham and Robin uthappa Love Story) हे बंगळुरूमध्ये एकाच कॉलेजमध्ये होते. शीतल कॉलेजमध्ये रॉबिन उथप्पाची सिनियर होती. दोघेही सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. एका मुलाखतीत शीतलने सांगितले होते की, उथप्पाने तिला गुघघ्यावर बसून प्रपोज केले होते. रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल गौतमही क्रीडा पार्श्वभूमीतून आली आहे. शीतल यापूर्वी टेनिसपटू राहिली आहे. तिने वयाच्या 9 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली.

team india batter Robin Uthappa and his wife Sheethal Goutham love story  and photos | Cricketer's Love Story: टीम इंडिया के इस प्लेयर को अपनी पत्नी  से दो बार करनी पड़ी थी

शीतलचा भाऊ अर्जुन गौतम (Arjun Gautham) हा देखील टेनिसपटू राहिला आहे. शीतल गौतम (Sheetal Gauhtam) ही हिंदू धर्माची आहे, तर उथप्पा (Robin Uthappa) ख्रिश्चन आहे. अशा परिस्थितीत दोघांनी 3 मार्च 2016 ला आधी ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले आणि एका आठवड्यानंतर 11 मार्च 2016 रोजी दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.

Robin Uthappa marries Sheethal Goutham: See pics of Indian cricketer and  tennis star's wedding | India.com

रॉबिन उथप्पा आणि शीतल गौतम ऑक्टोबर 2017 मध्ये पहिल्यांदा आई-वडील झाले. जुलै महिन्यात शीतल गौतमने एका मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा असे ठेवले आहे.