टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने गूपचुप उरकलं लग्न, कोण आहे तो क्रिकेटर?

सोशल मीडियाद्वारे लग्नाबाबतची माहिती दिली आहे.

Updated: Jul 16, 2021, 10:47 PM IST
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने गूपचुप उरकलं लग्न, कोण आहे तो क्रिकेटर?  title=

मुंबई : टीम इंडियाचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा बी संघ हा श्रीलंका दौऱ्याच्या गडबडीत आहे. टीम इंडियाचे दोन्ही संघ गडबडीत असताना टीम इंडियाच्या या अष्टपैलू खेळाडूंनं गुपचुप लग्न उरकलं आहे. ऑलराऊंडर खेळाडू शिवम दुबे विवाहबद्ध झाला आहे. शिवमने आज (16 जुलै) सोशल मीडियाद्वारे लग्नाबाबतची माहिती दिली आहे.  (Team India All Rounder Shivam Dube his Married with his girlfriend Anjum Khan)

शिवमने त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत विवाहबद्ध झाला आहे. शिवम आणि अंजुम या दोघांनी आपल्या धर्म आणि पंरपरेनुसार विवाह केला.शिवमने अचानक आणि गुपचुप लग्न केल्याने त्याचे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. 

शिवम त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. शिवमने 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियासाठी डेब्यू केलं होतं. शिवम दुबे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतो. शिवम दुबेने मुंबईकडून खेळताना एका ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचण्याचा कारनामा केला होता. विशेष म्हणजे त्याने हा कारनामा दोनदा केला होता. 

शिवमने आतापर्यंत 1 वनडे आणि 13 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. शिवम आयपीएलमध्ये सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. तर तो याआधी बंगळुरुकडूनही खेळला आहे.