धक्कादायक! कोहलीने अचानक घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, म्हणाला 'अंडर-19 वर्ल्ड कप माझ्यासाठी...'

Taruwar Kohli News : विराट कोहलीला अंडर - 19 चा वर्ल्ड कप जिंकवून देणारा विराटचा जुना साथीदार तरुवर कोहली याने प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम ठोकला.

सौरभ तळेकर | Updated: Feb 20, 2024, 08:15 PM IST
धक्कादायक! कोहलीने अचानक घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, म्हणाला 'अंडर-19 वर्ल्ड कप माझ्यासाठी...' title=
Taruwar Kohli announces retirement

Taruwar Kohli announces retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या अनेक माजी खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. नुकतीच मनोज तिवारीने रणजीमधून निवृत्ती जाहीर केली. तर अनेक खेळाडूंनी फस्च क्लास क्रिकेटला रामराम ठोकला आहे. अशातच आता विराट कोहलीला अंडर - 19 चा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. होय, विराटचा जुना साथीदार तरुवर कोहली (Taruwar Kohli) याने प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम ठोकला. 2008 मध्ये विराट कोहलीच्या कॅप्टन्सीखाली अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) जिंकवण्यात तरुवर कोहलीचा वाटा होता. 218 धावा करत त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने आयपीएल (IPL 2008) देखील गाजवली होती.

तुम्हाला माहित नसेल तर, आयपीएल 2008 मध्ये तरुवर कोहलीला राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं होतं आणि याच वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलवर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा देखील भाग होता. मात्र, त्यानंतर तो आयपीएलमध्ये दिसला नाही. फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए कारकिर्दीमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली मात्र त्यानंतर त्याचं नाव चर्चेतून गायब होऊ लागलं. 2013 मध्ये जेव्हा तरुवरने ट्रिपल सेंच्यूरी ठोकली तेव्हा त्याच्या नावाची चर्चा झाली. मात्र, सिलेक्टरने त्याला पुढे खेळण्याची संधी दिली नाही.

तरुवरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावात 4573 धावा केल्या. त्याच्या नावावर 74 विकेट्सही आहेत. याशिवाय कोहलीने आपल्या लिस्ट ए करिअरमध्ये 72 सामने खेळताना 1913 धावा केल्या आहेत. तरुवर कोहली पंजाब आणि मिझोरामकडून खेळला.

काय म्हणाला Taruwar Kohli ?

माझ्या देशासाठी 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणं आणि २००८ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल ट्रॉफी जिंकणं आणि पुढे जाणे हा एक अविश्वसनीय प्रवास आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात माझ्या मित्रांसोबत रस्त्यावर खेळण्यापासून ते माझा बालपणीचा मित्र अभिनवसोबत जेडीसीएमध्ये प्रवेश मिळवण्यापर्यंत केली.खेळाच्या मूलभूत गोष्टी अगदी लहान वयात शिकायला मिळाल्या आणि जेडीसीए व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांचे नेहमीच आभारी राहीन, असं तरुवर म्हणतो.

माझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि मला क्रिकेटचे मौल्यवान धडे शिकविल्याबद्दल सर्व प्रशिक्षकांचे विशेष आभार... मला माझी आवड कायम ठेवण्याची संधी दिल्याबद्दल सीएएम व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांचे खूप खूप आभार आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मामन सर आणि पीव्ही सर यांचे विशेष आभार, असं म्हणत त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.