NAM vs NED: नेदरलँडच्या विक्रमजीत सिंगने मारले सलग दोन षटकार, पण कौतुक बाळाचं! Video Viral

नामिबियानं 20 षटकात 6 गडी गमवून 121 धावा केल्या आणि नेदरलँडला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं. नामिबियानं दिलेलं आव्हान नेदरलँडनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. नेदरलँडने नामिबियावर 5 गडी आणि 3 चेंडू राखून विजय मिळवला. पण हा सामना पाहण्यासाठी आलेल्या बाळाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Updated: Oct 18, 2022, 01:46 PM IST
NAM vs NED: नेदरलँडच्या विक्रमजीत सिंगने मारले सलग दोन षटकार, पण कौतुक बाळाचं! Video Viral title=
Photo- Twitter

T20 World Cup Namibia vs Netherland: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. ग्रुप स्टेजमधील 8 संघ सुपर 12 फेरीत स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. नामिबियानं श्रीलंकेला (Namibia Sri Lanka) आणि स्कॉटलँडने वेस्ट इंडिजला (Scotland Vs West Indies) पराभूत करत मोठा उलटफेर केला आहे. आता नेदरलँडने सलग दोन सामने जिंकत सुपर 12 फेरीत स्थान निश्चित केलं आहे. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात नामिबियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियानं 20 षटकात 6 गडी गमवून 121 धावा केल्या आणि नेदरलँडला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं. नामिबियानं दिलेलं आव्हान नेदरलँडनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. नेदरलँडने नामिबियावर 5 गडी आणि 3 चेंडू राखून विजय मिळवला. पण हा सामना पाहण्यासाठी आलेल्या बाळाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

विजयी धावांचा पाठलाग करताना नेदरलँडच्या खेळाडूंना पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी केली. मॅक्स ओडाउड (Max O'Dowd) आणि विक्रमजीत सिंग (Vikramjit Singh) या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 59 धावांची भागीदारी केली. विक्रमजीत सिंगनं 31 चेंडूत 39 धावा केल्या. या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. नामिबियानं संघाचं चौथं षटक शिकोंगोच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विक्रमजीत सिंगने उंच षटकार ठोकले. पण षटकार बघाताना कॅमेरामननं एका लहानग्याला आपल्या कॅमेऱ्याच चित्रित केलं आहे. त्या बाळाची नजर शेवटपर्यंत चेंडूवरून हटली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, माझ्यापेक्षा या बाळाची नजर तीक्ष्ण आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, खरंच बाळ क्रिकेट बघण्यात गुंतल्याचं दिसतंय.