टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी बातमी, टीम इंडियाच्या फिनिशरने केली निवृत्तीची घोषणा

T20 World Cup 2024 : 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात झालीय. टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला येत्या 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी घडमोड घडली आहे. टीम इंडियाच्या फिनिशरने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे

राजीव कासले | Updated: Jun 3, 2024, 05:10 PM IST
टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी बातमी, टीम इंडियाच्या फिनिशरने केली निवृत्तीची घोषणा title=

T20 World Cup 2024 : 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात झालीय. टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला येत्या 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी घडमोड घडली आहे. टीम इंडियाच्या (Team India) फिनिशरने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. स्टार क्रिकेटर केदार जाधवने (Kedar Jadhav) क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटला अलविदा केलं आहे. 39 वर्षांच्या केदारने 3 जूनला सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निवृत्ती (Retirement) घोषणा केली. केदार आपला शेवटचा सामना 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

केदार जाधवची पोस्ट
केदार जाधवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने म्हटलंय 'माझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून मी निवृत्ती स्विकारत आहे. 

केदार जाधवची क्रिकेट कारकिर्द
केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकाविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. केदार भारतासाठी 73 एकदिवसीय संघ खेळला असून यात त्याने 42.09 च्या अॅव्हरेजने 1389 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 101.60 इतका होता. केदारने एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामन्यात 2 शतकं आणि 6 अर्धशतकं केली.

केदारने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही आपली जादू दाखवली. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 विकेट घेतल्यात. तर 2015 मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. केदार एकूण 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून यात त्याने 20.33 अॅव्हरेजने 122 धावा केल्यात.

केदारची धोनी स्टाईल निवृत्ती
केदारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही निवृत्ती माहिती दिली. यात त्याने म्हटलंय 'दुपारी 3 वाजल्यापासून मला क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त झाल्याचं समजा'. यापोस्टबरोबर केदारने आपला एक फोटो शेअर केला आहे. फोटोच्या मागे 'जिंदगी के सफर में...' गाणं जोडण्यात आलं आहे. केदार जाधवच्या या निवृत्तीच्या स्टाईलने चाहत्यांना टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणीची आठवण करुन दिली. धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती.

धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद. संध्याकाळी 5 वाजून 29 मिनिटापासून मला क्रिकेटमधून निवृत्त समजा' याबरोबरच धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ऐतिहासिक फोटो शेअर केला होता आणि यामागे धोनीचं आवडतं गाणं 'मैं पल दो पल का शायर हूं ' सुरु होतं. 

टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर
केदार जाधव हा भारताचा बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंग धोनीने केदारला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भरपूर पाठिंबा दिला. केदार आयपीएलमध्ये 93 सामन्यात 1196 धावा केल्यात. केदार आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायजर्स हैदराबाद, कोच्चि टस्कर्स केरला आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला आहे.