आठ संघ, 12 सामने! सुपर-8 मध्ये कोणत्या संघाचे कधी सामने... संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

T20 WC 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. सुपर-8 साठी सर्व आठ संघ निश्चित झाले आहेत. तर पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड या बलाढ्य संघांना ग्रुप सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला आहे.

राजीव कासले | Updated: Jun 17, 2024, 07:07 PM IST
आठ संघ, 12 सामने! सुपर-8 मध्ये कोणत्या संघाचे कधी सामने... संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर title=

T20 World Cup 2024 Super 8: टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. सुपर-8 साठी (Super-8) सर्व आठ संघ निश्चित झाले आहेत. आठ संघांमध्ये एकून 12 सामने खेळवले जाणार आहेत. यातून चार संघ सेमीफायनलमध्ये (T20 WC Semifinal) पोहोचतील. सुपर-8 मध्ये भारतासहित यजमान अमेरिका, ऑस्ट्रेलियात, इंग्लंड, अफगाणिस्तान, वेस्टइंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या आठ संघांनी क्वालीफाय केलं आहे. सुपर-8 च्या सामन्यांना 19 जूनपासून सुरुवात होईल. पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान रंगणार आहे. तर भारताचा पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानबरोबर खेळवला जाईल. 

सुपर-8 मध्ये दोन ग्रुप
सुपर-8 साठी दोन ग्रुप बनवण्या आले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघांचा समावेश आहे. ग्रुप-1 मध्ये भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे. तर ग्रुप-2 मध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, युएसए आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. 

प्रत्येक संघाचे तीन सामने
सुपर-8 मध्ये प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. यातले टॉप दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये पहिला सामना 20 जूनला रंगणार आहे. बारबाडोसमध्ये भारत-अफगाणिस्तान आमने सामने येतील. त्यानंतर 22 जूनला एंटिग्वामध्ये भारत-बांगलादेश तर सेंट लूसियामध्ये 24 जूनला भारत-ऑस्ट्रेलिया सामने खेळवले जातील.

टी20 वर्ल्ड कप : सुपर-8 चं संपूर्ण वेळापत्रक
19 जून : यूएसए विरुद्ध दक्षिण अफ्रीका, नॉर्थ साउंड, एंटीगुआ
19 जून : इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज, ग्रोस आइलेट, सेंट लूसिया
20 जून : अफगाणिस्तान विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, बारबाडोस
20 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, एंटीगुआ
21 जून : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका, ग्रोस आइलेट, सेंट लूसिया
21 जून : यूएसए विरुद्ध वेस्ट इंडीज, ब्रिजटाउन, बारबाडोस
 22 जून : भारत विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, एंटीगुआ
22 जून : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अर्नोस वेले, सेंट विंसेंट
23 जून : यूएसए विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, बारबाडोस
23 जून : वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण अफ्रीका, नॉर्थ साउंड, एंटीगुआ
24 जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ग्रोस आइलेट, सेंट लूसिया
24 जून : अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश, अर्नोस वेले, सेंट विंसेंट

सेमीफायनल-फायनलचे सामने
सुपर-8 चे सामने जिंकल्यानंतर 26 जूनला सेमीफायनलचा पहिला सामना रंगेल. तर 27 जूनला सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला जाईल. 29 जूनला ब्रिजटाऊनमध्ये टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा थरार रंगेल.