T20 World Cup, IND vs SA : टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टार खेळाडू विराट कोहलीने दोन्ही मॅचमध्ये अर्धशतके ठोकत त्याची ताकद दाखवून दिली आहे. आता भारतीय संघाचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिसोबत असणार आहे. या सामन्याआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामधील पिचबाबत स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. (T20 World Cup 2022 virat kohli says no better batting pitch once you get used to pace before match against south africa marathi Sport News)
काय म्हणाला विराट?
खेळाडूला वेगवान माऱ्याची सवय असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी फलंदाजीसाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही टूर्नामेंटसाठी भारतातून तयार होऊन येऊ शकत नाही. तुम्ही इथली परिस्थिती जाणून घ्या आणि मग स्वतःला इथल्या वातावरणाशी जुळवून घ्या. वेगवान माऱ्याची आवड असेल तर ऑस्ट्रेलियापेक्षा चांगलं विकेट नसल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियात खेळताना त्याला खेळात फलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करावा लागला नसल्याचंही कोहलीने सांगितलं. तिसऱ्या सामन्यामध्ये कोहलीकडेही सर्वांचा नजर असणार आहेत. दोन सामन्यामध्ये कोहलीने ज्या प्रकारे प्रदर्शन केलं आहे त्यातून त्याची ताकद दिसून आली आहे.
कोहलीची ऑस्ट्रेलियामधील आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल कोहलीला इथल्या मैदानांवर खेळायला का आवडतं. कारण कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटने 55 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 66 डावांमध्ये 56.44 च्या सरासरीने एकूण 3,274 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर कोहली ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.