मुंबई : पाकिस्तानची क्रिकेट टीम आणि इंग्रजी यांचा 36 चा आकडा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेकदा इंग्रजीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी टीमच्या खेळाडूंची तारांबळ उडताना दिसते. दरम्यान सध्याच्या कर्णधार बाबर आझम हा देखील याला अपवाद ठरलेला नाहीये. इंग्रजीच्या मुद्द्यावरून बाबर आझमला देखील ट्रोल करण्यात आलंय. यावेळी बाबर आझमचं 7 वर्ष जुनं ट्विट सध्या व्हायरल होतंय.
7 वर्ष जुन्या या ट्विटवरून लोकांनी आता बाबरला ट्रोल करण्यास सुरुवात केलीये. या ट्विटमध्ये बाबरने इंग्रजीत फक्त 'वेलकम झिम्बाब्वे' असं लिहिलंय. मात्र या ट्विटमध्ये त्याने स्पेलिंग मिस्टेक केलीये.
T20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेसारख्या कमकुवत टीमविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर युजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्विटच्या माध्यमातून बाबरला ट्रोल करण्यासाठी यूजर्सना एक निमित्तच सापडलंय.
2015 वर्षीच्या मे महिन्याची ही गोष्ट आहे. झिम्बाब्वे टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यानंतर दोन्ही टीममध्ये तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांची सिरीज खेळली होती. झिम्बाब्वेची टीम पाकिस्तानात पोहोचली त्याचवेळी बाबर आझमने स्वागत करण्यासाठी हे ट्विट केलं होतं. तेव्हा बाबरने लिहिले, 'Welcome zimbaway.' Zimbabwe च्या स्पेलिंगवरून त्याला ट्रोल केलं जातंय.
झिम्बाब्वे इंग्रजीमध्ये 'Zimbabwe' असं लिहिलं जातं. तर बाबरने 'Zimbabwe' असं लिहिलं होतं. बाबरने शेवटच्या तीन अक्षरात 'bwe' ऐवजी 'way' लिहिलेलं. यावर यूजर्सनी अनेक प्रकारे कमेंट करत बाबरला जोरदार ट्रोल केलंय.
Welcome zimbaway
— Babar Azam (@babarazam258) May 19, 2015
पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाव्बेने पाकिस्तानला 131 रन्सचं टारगेट दिलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना 129 पर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 11 रन्सची आवश्यकता होती. मात्र अवघे 9 रन्स करता आल्याने पाकिस्तानचा पराभव झाला.
या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसली. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम 9 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स करू शकला, तर मोहम्मद रिझवानने 16 बॉल्ममध्ये 14 रन्स करू शकला. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 रन्स केले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 रन्सचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. दुसरीकडे झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने 3 विकेट्स घेतले.