Nasser Hussain Team India: आगामी T20 World Cup 2022 साठी आता सर्वच संघ तयारीला लागले आहेत. सर्व संघ सध्या सराव सामने खेळत तयारी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे टीम इंडियाचे (Team India) खेळाडू सुद्धा मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. दोन दिवसांनंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्ध सराव (india t20 world cup practice match) सामना खेळतील. भारताची तगडी बॉटिंग लाईनअप पाहता भारतीय संघ यंदा वर्ल्ड कप घरी घेऊन येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Nasser Hussain) याने मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटच्या अस्मितेला मोठा धक्का बसलाय.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Former england captain nasser hussain) याने एका कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाने आत्ताच टी-ट्वेंटी मालिकेत विजय मिळवला आहे. असं असलं तरी भारतीय संघ आयसीसीच्या (ICC tournaments) मोठ्या मालिकेत भित्र्यासारखी (Team india timid approach) खेळते, त्यामुळे संघाला मोठं नुकसान होतं, असं नासिर हुसैन म्हणाला आहे.
आणखी वाचा - T20 World Cup मध्ये कोहलीला हा 'विराट' विक्रम खुणावतोय, जाणून घ्या
आयसीसीच्या मालिका भारतीय संघासाठी मोठा चिंतेचा विषय राहिला आहे. भारताकडे दिग्गज खेळाडू आहेत. ज्यांना संघातून सारखी संधी मिळत नाही. खेळाडू संघातून आतबाहेर होत राहतात. टीम इंडियाने (Team India) सर्व संघांचा पराभव केलाय. मात्र, मोठ्या आयसीसीच्या मालिकेत टीम इंडिया भित्र्यासारखी खेळते, हे देखील सत्य आहे, असं नासिर हुसैन म्हणालाय.
पुढे बोलताना नासिर म्हणाला, " टीम इंडियाने मागील अनेक वर्ल्ड कपच्या सामन्याच आक्रमकता दाखवली, विशेषता पावरप्लेमध्ये चांगली कामगिरी राहिलीये. सुर्यकुमार सारखे निडर खेळाडू संघात आहेत. मात्र, बुमराह आणि जडेजा नसताना देखील संघाला न घाबरता खेळ दाखवावा लागेल." भारतीय संघाचा पहिला सामना (t20 world cup 2020 schedule, india) हा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे. येत्या 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.